आणि राहुरीचे पोस्ट ऑफिस झाले गायब !!
शहरातील पोस्ट ऑफिस झाले स्थलांतरित राहुरी खुर्दला
राहुरी - विशेष वृत्त
वरील बातमीचा मथळा ( हेडिंग ) ऐकला तर राहुरी करांचा मनात धास्ती वाढली असेल ! घाबरू नका ... राहुरी चे पोस्ट ऑफिस शहरातील मेन रोडवर आहे त्याच ठिकाणी आहे .
मात्र सर्वाधिक ठेवीदार , खातेदार व विविध पोस्टाच्या योजनांचे लाभ घेणाऱ्या नागरिकांना सहज उपलब्ध असणारे राहुरी टाऊन पोस्ट ऑफिस मात्र गायब झाले आहे , अर्थातच शहरातून ते गायब झाले असले तरी ते सध्या राहुरी खुर्द येथे स्थलांतरित झालेले आहे .
आणि मोठ्या संख्येने ठेवीदार खातेदार विविध योजनांचे लाभार्थी यांना या गोष्टीचा मात्र थांग पत्ताच नाही !!
गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासून राहुरी शहरात कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टपाल विभागाचे उपविभाग ( राहुरी ) कार्यालय असायचे , तर राहुरी शहरासाठी टपाल विभागाचे राहुरी टाऊन पोस्ट कार्यालय मेन रोड , बाजारपेठेतील जैन मंदिरासमोर असायचे .
मध्यंतरीच्या काळात बाजार समिती अर्थात मार्केट कमिटीतील उपविभाग पोस्ट ऑफिस हे बाजारपेठेमध्ये नव्या इमारतीत स्थलांतरित झाले . याच ठिकाणी बाजूला राहुरी टाऊन पोस्ट कार्यालय थाटलेले होते . गेल्या काही काळापासून शहरातील मध्यवर्ती भागात राहुरी टाऊन पोस्ट ऑफिस मध्ये तमाम राहुरीकरांचे बचत खाते ,सुकन्या योजना , मुदत ठेवी , अल्प व दीर्घकालीन मुदत ठेवी , ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेवीच्या योजना व अन्य अशा विविध योजनांसाठी शहरवासीयांना अगदी हे पोस्ट ऑफिस जवळचे झालेले आहे .
दिवसभर या ठिकाणी नागरिकांची रेलचेल सुरू असते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या राहुरी टाऊन पोस्ट ऑफिस च्या खिडकी बाहेर एक लेखी हस्ताक्षरात चिट्ठी लावलेली असून त्यात हे राहुरी टाऊन पोस्ट ऑफिस राहुरी खुर्द येथे स्थलांतरित करण्यात आले आहे , संबंधित खातेदार नागरिकांनी राहुरी खुर्द येथे यापुढे संपर्क साधावा असे म्हटले आहे .
शहरात व उपनगरीय भागात ज्येष्ठ नागरिक महिलांसह मोठ्या संख्येने राहुरी टाऊन पोस्ट ऑफिसशी संबंधित आहेत . अचानक हे पोस्ट ऑफिस राहुरी खुर्दला स्थलांतरित झाल्यामुळे राहुरी खुर्द येथे जाण्यासाठी नागरिका ज्येष्ठ नागरिक विशेषतः महिलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागणार आहे . पूर्वी रस्ता ओलांडून मार्केट यार्ड मधील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागायचे म्हणून नागरिकांनी शहरातील टाऊन पोस्ट ऑफिस ची व्यवहार सुरू केले होते , हे विशेष .
अनेक नागरिकांनी हे राहुरी टाऊन पोस्ट ऑफिस शहरातच असावे , यासाठी राहुरी चे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घालून नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेश लंके आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या कडे याविषयी लक्ष वेधणार आहेत.
Post a Comment
0 Comments