श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे उद्यापासून पांडुरंग महोत्सव
राहुरी - महेश कासार यांजकडून
दिनांक २९/७ ते४/८/२०२४ या कालावधीत श्री क्षेत्र ताहाराबाद येथे श्रीपांडुरंग महोत्सव (गोपाळ काळा) साजरा करण्यात येणार आहे आशी माहिती महिपती महाराज देवस्थानच्या वतीने देण्यात आली .
२९/७रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथे गेलेल्या पायी दिंडी चे आगमन व स्वागत ३०/७ रोजी सकाळी भिक्षा कार्यक्रम अभिषेक, काकडा आरती नैवेद्य दि३१/७रोजी एकादशी निमित्त काकडा भजन ,महाआभिषेक ,आरती, नैवेद्य ,नगर प्रदक्षिणा ,सकाळी ११वाजता ह भ, प नाना महाराज गागरे यांचे हरि किर्तन ,१२वा मध्यान आरती दुपारी ,चार वाजता ह भ प सुभाष महाराज आहेर यांचे हरि किर्तन ,रात्री आठ वाजता ह भ प विकास महाराज गायकवाड यांचे हरि किर्तन, दि १/८रोजी काकडा भजन कुळधर्म द्वादशी पारणे महाप्रसाद सकाळी दहा वाजता ह भ प रामदास महराज क्षीरसागर यांचे हरि ,किर्तन दुपारी चार वाजता ह भ प मनोहर महाराज सिनारे यांचे प्रवचन, रात्री आठ वाजता ह भ प विकास महाराज गायकवाड यांचे हरिकिर्तन दि २/८रोजी सकाळी बाळकृष्ण महाराज गागरे यांचे काल्याचे किर्तन ,दुपारी चार वाजता ह भ प महंत अर्जुन महाराज तनपुरे यांचे गोपाळ काल्याचे हरि किर्तन व दही हंडी ,दि ३/८रोजी छबिना मिरवणूक, आरती शिळा गोपाळ काला ४/८रोजी सकाळी सहा वाजता पाऊल घडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे
गोपाळ काला ऊत्सवास भाविकांनी मोठी संख्येने उपस्थित राहावे असे असे आवाहन महिपती महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले(महेश कासार राहुरी)
Post a Comment
0 Comments