बांधकाम कामगार नोंदणी मध्ये शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक सहन केली जाणार नाही. – प्रशांत लोखंडे
बांधकाम कामगारांची अडवणूक केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देणार - देवेंद्र लांबे
(राहुरी प्रतिनिधी) - राहुरी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी श्री.शिंदे यांच्या दालनात मा.खा.सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव शिवसेना युवा नेते श्री.प्रशांत लोखंडे अचानक भेट देत बांधकाम कामगार नोंदणी दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांकडून होत असलेली अडवणुकी वरून आक्रमक होत खडे बोल सुनावले.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,युवसेना ऊ.न.जि.प्र.शुभम वाघ,वैद्यकीय मदत कक्षाचे प्र.अशोक साळुंके,ता.संपर्क प्र.अशोक तनपुरे,ता.संघटक महेंद्र उगले,उप.ता.ऊ.सुनील खपके आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत लोखंडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली.ग्रामसेवक मजूर असल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करतात.खाजगी अभियंत्यांनी बांधकाम मजूर असल्याचा दाखला दिल्यास त्यांना कामगार आयुक्तांकडून पत्रव्यवहार करत किचकट दस्तावेजाची मागणी केली जाते.फुटकळ स्वरूपाचे काम करणारे अभियंता व ठेकेदार मागणी केलेले दस्तावेज उपलब्ध करू देवू शकत नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी राबविलेली उत्कृष योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळत नाही.त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेवून उचित कार्यवाही करावी असे श्री.लोखंडे यांनी म्हंटले आहे.
*चौकट – बांधकाम कामगार नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा व बांधकाम कामगारांची अडवणूक न करता आलेली प्रकरणे मंजूर करावीत.शासकीय कामात हलगर्जीपणा केल्यास शिवसेना स्टाईलने शिवसैनिक उत्तर देतील.बांधकाम कामगारांना अडचण आल्यास शिवसेना कार्यालयास राहुरी येथे संपर्क साधावा.- देवेंद्र लांबे –शिवसेना राहुरी तालुका प्रमुख*
या प्रसंगी बांधकाम कामगार प्रतिनिधी सुरेश होन,विशाल खपके,सतीश पांडागळे,गोकुळ होन,गणेश खपके,सुनील खपके,गेनुदास होन,सुभाष होन,जालिंदर काळे,प्रवीण भोसले,रवींद्र म्हस्लूद,पांडुरंग गडकर,सोमनाथ जऱ्हाड आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments