Type Here to Get Search Results !

उद्या मुळाधरण साठा दहा टीएमसी पार करेल

 उद्यापर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा दहा टीएमसी पार करेल

                     ( मुळा धरणाचा संग्रहित फोटो )

राहुरी - विशेष वृत्त

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाकडे आज पहिल्यांदाच पाण्याची मोठी आवक सुरू असून उद्यापर्यंत धरणसाठा दहा टीएमसी पार करेल .

जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , आज सोमवारी सायंकाळी धरणसाठा साडेनऊ टीएमसीवर पोहोचला तर पाण्याची आवक कोतुळ जवळील मुळा नदीच्या लहित खुर्द येथील जल मापन केंद्रावर 3.20 मीटरला 8 हजार 028 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती .
यावर्षी धरणक्षेत्रात उशिराने पाऊस सुरू झाला , परिणामी पाण्याची आवकही उशिरा झाली. सहा जुलैपासून आज सोमवार 22 जुलै पर्यंत सोळा दिवसात साडेतीन टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले तर पाण्याची पातळी 14 फुटाने वाढली आहे . मागील वर्षी पेक्षा धरण साठा पावणेतीन टीएमसी ने कमी आहे . चांगला पाऊस होत असल्याने लवकरच धरण निम्मे भरण्याची आशा व्यक्त केली जात आहे .

Post a Comment

0 Comments