Type Here to Get Search Results !

मुळा धरणसाठा पोहोचला आठ टीएमसीवर ; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम

 मुळा धरणसाठा पोहोचला आठ टीएमसीवर ; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम


( संग्रहित छायाचित्र )

राहुरी - विशेष वृत्त

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणच्या पाणलोटात पावसाने हजेरी सुरूच ठेवल्याने आज सायंकाळी धरण साठा आठ टीएमसी वर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाण्याची पातळी 9 फुटाने कमी असून जवळपास अडीच टीएमसी पाणी कमी आहे .

त्यामुळे धरणाचा पाणलोट क्षेत्र आणि लाभक्षेत्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे . जुलै चा पहिला पंधरवडा हा राज्यातील सर्वच घाटमाथे आणि धरण क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जातात. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ठाणे , नाशिक , पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जोरदार पर्जन्यवृष्टी सध्या होत आहे. तुलनेने मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात याच पावसाचे प्रमाण सध्या कमी दिसत आहे .

 गेल्या वर्षी मुळा धरण साठ्याने दहा टीएमसी साठा पार केलेला होता. यंदा 15 जुलै पर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात धरणाचा पाणीसाठा खूपच कमी आहे . आज रविवारी सायंकाळी धरण साठा आठ टीएमसी वर पोहोचला होता तर धरणाकडे पाण्याची आवक 3 हजार 416 क्युसेकने सुरू होती. धरणाची पाणी पातळी 1 हजार 768 फुटांवर पोहोचली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात अर्थात राहुरी शहरासह तालुक्यात अधून मधून पावसाची भुर भुर होत असून लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments