Type Here to Get Search Results !

राहुरीच्या त्या 120 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

 राहुरीच्या त्या 120 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात


त्या 120 विद्यार्थ्यांसाठी आमदार प्राजक्त तनपुरे सरसावले

राहुरी  ( प्रतिनिधी ) 

पुणे विद्यापीठ व महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे राहुरी महाविद्यालयासह तालुक्यातील दोन तीन महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेची परीक्षा दिलेल्या १२० विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण पुणे विद्यापीठाकडे वेळेत न पोहचल्याने सदर १२० विद्यार्थी पास असूनही त्यांचे मार्कशीटवर नापास शेरा पडल्याने त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने यात लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना राहुरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या व पुणे विद्यापीठाच्या वरीष्ठाशी चर्चा करण्यात आली असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे सांगितले.

आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट )तालुका उपाध्यक्ष युवराज तनपुरे,प्रशांत तनपुरे,कार्तिक जाधव, तुषार तनपुरे, वैभव गोपाळे, राहुल काळे, अथर्व कोपनर, अवधूत शिरसाट यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले असता आमदार तनपुरे त्या विद्यार्थ्यांसमवेत थेट राहुरी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्नाबाबत प्रभारी प्राचार्या अनिता अंत्रे उप प्राचार्य राजेंद्र गोसावी व अधीक्षक दत्तात्रय कोहकडे व कला वाणिज्य शाखेचे प्राध्यापक यांचेशी चर्चा केली.

प्राचार्या अनिता अंत्रे म्हणाले की तृतीय वर्ष कला शाखेतील १२० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली त्यावेळी त्यांना दिले जाणारे अंतर्गत गुण विद्यापीठाला काही तांत्रिक कारणामुळे विद्यापीठास न पोहचल्याने हा प्रश्न उपस्थित झाला असून तो फक्त राहुरी महाविद्यालयाचाच नसून तालुक्यातील देवळाली प्रवरा, सोनगाव सात्रळ येथील महाविद्यालयासह पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयाचा असल्याने आम्ही या प्रश्नाबाबत पुणे विद्यापीठाचे संबंधित विभागाकडे जाऊन चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या याबाबत पुणे विद्यापीठाच्या संबंधित विभागाची बैठक होऊन होऊन पंधरा दिवस झाले आहेत पण अद्याप कोणताही निर्णय न आल्याने हा प्रश्न मार्गी लागला नाही आमचे प्रयत्न सुरु आहे असे त्यांनी सांगितले. आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की महाविद्यालय व विद्यापीठ्याच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसला असून सदर विद्यार्थी उत्तीर्ण असताना केवळ अंतर्गत गुण न मिळाल्याने त्यांचे निकाल पत्रावर अनुत्तीर्ण असा शेरा पडल्याने या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास क्रमांस प्रवेश मिळत नाही,अनेकांना नौकरी शिवाय पर्याय नाही हा प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत तो पर्यंत त्यांचे भवितव्य अंधारात आहे म्हणून आज या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लवकर मार्ग काढण्यासाठी पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ महेश काकडे,कुलसचिव, यांचेशी फोन वरून चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments