विखे यांच्या त्या वक्तव्याला आमदार तनपुरे यांनी दिली बगल ; भाषणात काढलाही नाही चकार शब्द
राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्याची : विशेष वृत्त
माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या राहुरीतून विधानसभा लढविण्याच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विविध विकास कामांचा कार्यक्रम प्रवरा पट्ट्यातील धानोरे येथे संपन्न झाला .
आमदार तनपुरे यांच्या भाषणात मा.खा.डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याबाबत बोलतील अशी शक्यता प्रवरा पट्ट्यातील गावांसह राहुरी मतदार संघात, संगमनेर तालुक्यात व्यक्त होत होती . मात्र आजच्या भाषणात विखेंच्या वक्तव्याबाबत आमदार तनपुरे यांनी कोणतेच वक्तव्य न केल्याने या विषयाला जणू बगल दिल्याची चर्चा प्रवरा पट्ट्यात सुरू आहे .
महाविकास आघाडीचा काळातील विकास कामांना सध्याच्या महायुती सरकारने दिलेल्या स्थगितीला हायकोर्टातून उठवून ती पूर्ण करण्याचे काम आपण करत असून स्थगिती दिलेली अनेक कामे कामे आपण पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर करणार , असे सूतोवाच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सोनगाव सात्रळ धानोरे येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन, शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी केले .
आमदार तनपुरे म्हणाले की , ग्रामीण भागातील विशेषता शेतकऱ्यांच्या विरोधातील हे महायुतीचे सरकार असून अनेक ग्रामीण भागातील कामांना सरकारने स्थगिती दिली . सोनगाव सात्रळ परिसरातील कोट्यावधी रुपयांच्या कामांचा ही यात समावेश आहे .
अनेक वर्ष विरोधकांची सत्ता असताना ग्रामीण भागातील विकास कामे करता आली नसल्याचा आरोप करत तनपुरे यांनी सोनगाव सात्रळ धानोरे परिसरातील विकास कामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले .
Post a Comment
0 Comments