Type Here to Get Search Results !

राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण सुरू

 शिवरायांच्या पुतळा कोसळलेल्या प्रकरणी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू 




राहुरी ( प्रतिनिधी )



सिंधुदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचार आरोप असलेल्या व असंवेदनशील सरकारच्या विरोधात आ. प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले असून आज शनिवारी राहुरी बाजार समिती समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून या उपोषणाला मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी प्रतिसाद दिला आहे .


                         पंढरी मंगल कार्यालयात

         ( संपर्क रविन्द्र जगताप - 8605407030 )

           ( सिद्धार्थ जगताप - 9225260710 )

आमदार प्राजक्त तनपुरे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज सकाळी ९ ते ५ यावेळेत नगर मनमाड रस्त्यावरील राहुरी बाजार समिती समोर हे उपोषण सुरू केले आहे .

या उपोषण स्थळावर सकाळी ११ वा. शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व दुपारी ४ वा. शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान होणार आहे . या उपोषणास शिवप्रेमींनी पाठींबा व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती होती .


Post a Comment

0 Comments