Type Here to Get Search Results !

मुळा धरणातून आज दुपारी पाणी सोडणार

अखेर मुळा धरणातून आज नदीपात्रात त पाणी सोडणार आहे.



राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्यासाठी - विशेष वृत्त

15 ऑगस्ट पूर्वी पाणी सोडणार असल्याचे संकेत प्राप्त होते . अखेर धरण परिचालन सूचीनुसार साठा 22 हजार 800 दशलक्ष घनफूटवर पोहोचल्याने पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे .

धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून लाभ धारक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 दरम्यान जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी याबाबत जाहीर आवाहन केले आहे त्यात म्हटले की ,मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26,000 दलघफु (26 टीएमसी) आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान पाणीसाठा Lower Guide curve नुसार 21264 व Upper Guide Curve नुसार 22814 इतका पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दूपारी 03.00 वाजता मुळा धरणातून 2000 क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल. तरी याबाबत मुळा नदीकाठच्या गावांना या जाहीर आवाहनाद्वारे सूचित करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे मुळा धरणातून आज पाणी सोडण्यात येणार असल्याने राहुरी शहरासह सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे

Post a Comment

0 Comments