Type Here to Get Search Results !

मुळा धरणातून सोडलेल्या पाण्याची झलक पहाच

मुळा धरणातून नदीपात्रात सोडले 2 हजार क्युसेकने पाणी



राहुरी - प्रसाद मैड यांच कडून

 नगर जिल्ह्याला जल संजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणातून आज नदीपात्रात सर्व अकरा दरवाज्यातून 2 हजार क्युसेकने  पाणी सोडण्यात आले .

यावेळी सोडलेले पाणी पाहताना उपस्थित लाभधारक शेतकऱ्यांमध्ये जणू आनंदाश्रू वाहताना दिसून येत होते . जिल्ह्यातील सर्वच धरणांचे साठे 90% पुढे गेल्याने बहुतांश धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे . मुळा धरणाच्या पाण्याकडे सर्वांचेच नव्हे तर जायकवाडी अर्थात मराठवाड्याचे देखील लक्ष असते .



 यंदा 15 ऑगस्ट पूर्वी धरण साठा धरण परिचलन सूची प्रमाणे चार दिवस अगोदरच झाल्याने आज जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला .

 जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या हस्ते धरणावरील मशिनीची कळ दाबून दुपारी तीन वाजता पाणी सोडण्यात आले .

 11 दरवाज्यातून 2 हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात फेसाळत असल्याचे दृश्य सांडव्या नजीक अनेक लाभादारक शेतकऱ्यांसह हौशी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत असल्याचे चित्र दिसून येत होते . मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . मुळा नदी पात्रात पाणी सोडल्याने हौशी पर्यटकांचा ओघ धरणाकडे सुरू झाला आहे .

Post a Comment

0 Comments