भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मुळा धरण सांडव्यावर तिरंगा विद्युत रोषणाई कधी ? हौशी पर्यटकांचा सवाल
( संग्रहित फोटो आहे )
राहुरी - विशेष वृत्त
( संग्रहित फोटो आहे )
भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
याच अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणावर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येत असून वेगवेगळ्या धरणाच्या सांडव्यावर धरणांच्या भिंतीवर सांडव्यालगत विद्युत रोषणाई तिरंगा लेझर शो ची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र मुळा धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत असताना हौशी पर्यटक व धरण परिसरातील लाभधारक क्षेत्रात या विद्युत रोषणाईची प्रतीक्षा केली जात आहे .
नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी या तिरंगा विद्युत रोषणाईचा आनंद मुळा धरणावर यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आला होता .
धरणाच्या देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी अनेक वेळा वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक काम केली गेल्याचे आरोप देखील झालेले आहेत . मात्र स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त अजूनही कोणतीही विद्युत रोषणाई धरणावर व धरणाच्या 11 दरवाजांच्या परिसरातून न केल्याने त्याची प्रतीक्षा सुरूच असल्याचे धरण परिसर व लाभक्षेत्रातील हौशी पर्यटकांमध्ये होत आहे .
Post a Comment
0 Comments