राहुरीत शुक्रवारी तब्बल पाच इंच पाऊस
तालुक्यात बहुतांश ठिकाणी झाली पर्जन्यवृष्टी
अनेक ठिकाणी खरीप पिके पाण्यात
राहुरी ( विशेष वृत्त )
राहुरी शहरासह तालुक्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले .
दिवसभरात दोनदा जोरदार पाऊस झाला , सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली .गेल्या तीन ते चार दिवसांपासून राहुरी शहरासह तालुक्यात पावसाची चांगली हजेरी दिसून आली .
तीन दिवसांपूर्वी राहुरीत दोन दिवसात 100 मिलिमीटर पाऊस नोंद झाला होता. शुक्रवारी राहुरीत विक्रमी तब्बल 124 मिलिमीटर ( पाच इंच ) इतक्या पावसाची नोंद सतर्क राहुरी च्या पर्जन्यमापकावर नोंद झाली . गेल्या दोन वर्षातील हा विक्रम मानला जात आहे .
राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र व जिल्हा प्रशासनाने देखील शुक्रवारी दुपारनंतर नागरिकांच्या मोबाईल व सोशल मीडिया वर मेसेज पाठवून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता .
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी शुक्रवारी झालेला पाऊस हा सरासरी ओलांडणारा होता . कालच्या पावसाने अनेक ठिकाणी खरीपची पिके पाण्यात गेली आहे .आठवडाभरात ही दुसरी अतिवृष्टी असल्याने प्रशासनाने खरीप पिकांची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . शनिवारी देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे .
Post a Comment
0 Comments