Type Here to Get Search Results !

गोल्डन ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

गोल्डन ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


 

राहुरी ( प्रतिनिधी )



78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोल्डन ग्रुपच्या वतीने बारागाव नांदूर येथील संत तुकाराम विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तर जिल्हा परिषद उर्दू शाळेला पिटीसरावासाठी देणगी देण्यात आली .


बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गणवेश व देणगी चे वाटप नांदूरचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव पवार , सरपंच , विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक वृंद , ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आला .
गोल्डन ग्रुपचे समन्वयक युसुफभाई देशमुख यांनी सांगितले की , राहुरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या या ग्रुपने गेल्या 7 ते 8 वर्षांच्या काळात अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत . एकत्र आलेले सर्व सहकारी राहुरीसह नगर जिल्ह्यात तसेच नाशिक , ठाणे , सातारा , पुणे , मुंबई व परदेशात आपापल्या व्यवसाय नोकरी निमित्तानं स्थायिक झालेले आहेत . अनेक सहकारी पारंपरिक शेती व्यवसाय करतात . तरीही राहुरी कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करतात . आज समाजाचे काही देणे लागतो म्हणून हा उपक्रम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले .
संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक गोडे सर यांनी गोल्डन ग्रुपच्या सहकाऱ्यांचे आभार मानले . यावेळी गोल्डन ग्रुपचे संस्थापक मच्छिंद्र गुलदगड , समन्वयक युसुफभाई देशमुख , दिलीप गागरे , एकनाथ वाणी , प्रसाद मैड आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन तोंडे सर यांनी केले .

Post a Comment

0 Comments