राहुरीकरांच्या संकटाला आता ती धावून जाणार
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगर पालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या ताफ्यात नवी कोरी फायर बुलेट दाखल झाली असून आग , जळीत अशा संकट , घटनेच्या वेळी संकट ती आता धावून जाणार आहे .
राहुरी शहरासह तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जळीत व आगीच्या घटना घडतात .
यावेळी राहुरी नगरपालिकेची अग्निशामक दलाचे चार चाकी वाहन उपलब्ध होते .
अनेक वेळेला एखाद्या दुर्गम ठिकाणी , अरुंद बोळ , गल्ली किंवा ठिकाण असल्यावर जळीत घटना घडलेल्या ठिकाणी आपत्कालीन कक्षाच्या जवानांना अग्निशामक वाहन घेऊन जाण्यास अडथळे येतात .
जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या , मा. नगराध्यक्षा डॉ.सौ. उषाताई तनपुरे , आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेत यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन कक्ष विभागाच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांशी संवाद साधत याविषयी चर्चा केली होती . शासनाकडे तात्काळ उपलब्ध होणारे वाहनाची मागणी केली होती .
महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामक संचालनालयाच्याकडून राहुरी नगरपालिकेला नुकतीच रॅपिड फायर बुलेट नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे .
या दुचाकी फायर बुलेट मध्ये सायरन व्यवस्था तर आहेच शिवाय दोन्ही बाजूने वीस लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आहेत . पन्नास फूट पर्यंत जाईल असा फायर पंप पाईप देखील आहे . याशिवाय जळीत व लागलेली आग विझविण्यासाठी केमिकल देखील उपलब्ध असून कटावणी , वायर तोडण्याचे साहित्य , आदी आपत्कालीन काळातील साहित्य उपलब्ध आहे .
राहुरी शहर व परिसर मध्ये अनेक ठिकाणी अरुंद गल्लीबोळ, रस्ते असल्याने शासनाने फायर बुलेट उपलब्ध करून दिल्याने याची मदत जळीत किंवा अकस्मात आग लागलेल्या ठिकाणी होईल . जळीत झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेशी संपर्क केल्यास तात्काळ फायर बुलेट उपलब्ध केली जाईल , अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे .
Post a Comment
0 Comments