रॅलीसाठी भरभरून मिळालेल्या मदतीचा हिस्सा दिला गरजूंना
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर विविध शाळांमध्ये केले वाटप
12.08.2024 रोजी मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी येणाऱ्या समाजासाठी सर्व समाज बांधवांकडून विविध स्वरूपात आर्थिक स्वरूपात व वस्तू स्वरूपात भरभरून मदत मिळाली होती.
त्यात तांदळाचे कट्टे, साबुदाणा, शेंगदाणे, पाण्याचे बॉक्स, पाण्याचे जार, केळी व इतरही अनेक स्वरूपात मदत मिळालेली होती.
रॅलीतील सहभागी समाज बांधवांना सदर वस्तुपासून खिचडी बनविण्यात आली होती. सर्वांना त्याचे वाटपही व्यवस्थित झाले.पण अन्नाचा ऐक कण ही वायाला जाऊ देऊ नका अशी शिकवण व सूचना मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडून मिळाल्याने त्याचे पालन म्हणून आज 15 ऑगस्ट 2024 च्या शुभ मुहूर्तावर उरलेल्या तांदळाच्या कट्ट्यांचे वाटप विविध शाळेत करण्यात आले.
अखंड मराठा समाज अहमदनगर च्या वतीने उरलेले तांदळाचे कट्टे हे मतिमंद मुलांची शाळा, मूकबधिर विद्यालय, बालगृह प्रकल्प या ठिकाणी शिकणाऱ्या गरीब, वंचित मुला मुलींना कामं यावे ह्या हेतूने सावेडी, तपोवन रोड, कल्याण रोड,केडगाव अश्या विविध ठिकाणी असणाऱ्या शाळेमध्ये वाटप करण्यात आले.
यावेळी अखंड मराठा समाजाचे सेवक गोरख दळवी, वैभव भोगाडे, मिलिंद भोंगाने, गोरक्षनाथ पटारे,उद्योगपती बारस्कर साहेब,भाग्येश सव्वासे व इतरही अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.
जय जिजाऊ.... जय शिवराय.... जय मनोज दादा जरांगे पाटील...... 🙏
Post a Comment
0 Comments