Type Here to Get Search Results !

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ राहुरीत महिला एकवटल्या

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ राहुरीत महिला एकवटल्या



राहुरी  (  प्रतिनिधी  )


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झालेल्या घटनेचा राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीत निषेध व्यक्त करण्यात आला .



 यावेळी मोठ्या संख्येने महिला सदस्या उपस्थित होत्या . राहुरीचे तहसीलदार तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित महिलांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करून संबंधितांवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून कठोर कारवाईची मागणी केली .


यावेळी तालुकाध्यक्ष शारदा खुळे, वैशाली तनपुरे , इंदुमती आमटे, अश्विनी कोहकडे, परविन सय्यद, सविता खंडागळे, ज्योती वेताळ, संगीता धनवटे, अश्विनी कुमावत, संगीता आहेर, श्रद्धा तनपुरे, नंदा उंडे, वृषाली भुजाडी , वृषाली तनपुरे आदी उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments