राहुरी तालुक्यातील पत्रकाराला नगरमध्ये मारहाण करून लुटले
जिल्ह्यात खळबळ
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी तालुक्यातील पत्रकार बाळासाहेब कांबळे यांना शनिवारी रात्री नगर उपनगरात रस्त्यावर अपघाताच्या बनावाखाली अज्ञात व्यक्तींनी मारहाण करीत अक्षरशः लुटण्याची खळबळ जनक घटना घडली आहे .
याप्रकरणी बाळासाहेब कांबळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीत वांबोरी (ता. राहुरी) येथील बाळासाहेब श्रीपत कांबळे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा १३ हजार ५०० रूपयांचा ऐवज काढून घेतल्याचे म्हटले आहे . बाळासाहेब श्रीपत कांबळे (वय ४५) असे त्यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सावेडीतील तुळजाभवानी मंदिराजवळ अपघात झाला. चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते जखमी झाले . त्यानंतर त्या चारचाकीमधील तिघांनी फिर्यादीला त्यांच्या दुचाकीवर बळजबरीने बसून एमआयडीसीतील काकंरीया शोरूम येथे नेले. तेथे त्या तिघांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या खिशातील साडेतीन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
वांबोरी , तालुका राहुरी येथील पत्रकार बाळासाहेब कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे ते सक्रिय सदस्य आहेत . पत्रकारावर अपघाताचा बनाव करून लुटण्याच्या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . दरम्यान पत्रकार संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे
Post a Comment
0 Comments