Type Here to Get Search Results !

मुळा पाटबंधारे अलर्ट मोडवर ; दर तासाला पाण्याची नोंद

 .... ' त्या ' पावसामुळे वाढवला पाण्याचा विसर्ग




मुळा पाटबंधारे विभाग अलर्ट मोडवर ; दर तासाला पाण्याची नोंद


राहुरी ( प्रतिनिधी )


गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जवळच्या आणि कोतुळकडील झालेल्या पावसाची आवक पाहता मुळा धरणाच्या जलसंपदा विभागाने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला .
मात्र शनिवारी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने 15 हजार क्युसेक पर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला .
पूर नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पाणी परिस्थिती पाहता तात्काळ निर्णय घेतल्याने निर्णय क्षमता समोर आली आहे .
शनिवारी सकाळी पाण्याची आवक सायंकाळी थेट वाढल्याने हा निर्णय घेतल्याने पूर नियंत्रण कक्षाची तत्परता दिसली.
गुरुवारी मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह बहुतांश भागांमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाली . गुरुवारी रात्रीपर्यंत मुळाच्या जवळच्या क्षेत्रात 128 मिलिमीटर पाऊस झाला . यावेळी कोतुळकडे दीड हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती . याच काळात कोतुळकडील भागातही पर्जन्यवृष्टी झाली .
शुक्रवारी सकाळी धरणात पाऊण टीएमसी आवक झाल्याची नोंद झाली , त्यानुसार धरणसाठा साडे चोवीस टीएमसी वर पोहोचला होता . शुक्रवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात धरणात पाणी जमा झाले . त्याच वेळी कोतुळकडील आवक 7 हजार 310 क्युसेकने येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात येताच शनिवारी सायंकाळी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवक मध्ये वाढ करीत प्रारंभी 7 हजार,  नंतर 10 हजार तर रात्री साडेदहा वाजता 15 हजार क्युसेक पर्यंत वाढवण्यात आली. याचवेळी जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट जारी केला .
रविवारीही असाच 15 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच होता.  रविवारी सायंकाळी धरणाकडे कोतुळकडील मुळा नदीतून 8 हजार 301 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच होता .
जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अभियंता विलास पाटील , मुळाचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे आणि पूर नियंत्रण कक्षाचे स्टाफ द्वारे प्रत्येक तासाला पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहेत . दरम्यान मुळातून मोठा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने रविवारी दिवसभरात हौशी पर्यटकांनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या निसर्गाचा आनंद लुटला . तथापि स्थानिक पोलीस आणि जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांच्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments