Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीकडे मोठा विसर्ग

 नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी कडे मोठा विसर्ग



राहुरी -  ( सतर्क खबरबात जिल्ह्याची टीम )

धरणांच्या पाणलोटात पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू झाल्याने नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीकडे पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे .



सोमवारी सायंकाळी जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुळा धरणसाठा  24 हजार 645 दलघफू असून पाण्याची आवक 10 हजार 738 क्युसेकने तर पाण्याचा विसर्ग 10 हजार क्युसेकने  मुळानदी पात्रात केला जात आहे .

 भंडारदरा धरणातून 15 हजार 229 क्युसेकने निळवंडेत विसर्ग सुरू आहे तर पाऊस 70 mm झाला आहे . तसेच निळवंडे धरणातून  19 हजार 700 क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान जायकवाडी कडे नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने दोन दिवसात जायकवाडीचा उपयुक्त साठा 50% च्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

आज जायकवाडीचा एकूण साठा 62 टीएमसी ( 60 टक्के ) तर उपयुक्त साठा 35 टीएमसी ( 45 टक्क्यांवर ) पोहोचला आहे . 

 नगर जिल्ह्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments