Type Here to Get Search Results !

...तर मुळा नदीच्या पुलावर बेमुदत रास्ता रोको

...तर मुळा नदीच्या पुलावर बेमुदत रास्ता रोको 



नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचा जिल्हाधिकारी यांना इशारा 

राहुरी ( प्रतिनिधी )

नगर मनमाड महामार्गाचे काम होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी अन्यथा एक सप्टेंबर रोजी मुळा नदीच्या पुलावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे आज समितीचा शिष्टमंडळाने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे .

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला निवेदनात म्हटले की , नगर - मनमाड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अपघात होवू नये म्हणून खालील मागण्यांवर विचार व्हावा असे म्हटले आहे की , 

नगर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाऊस झाल्या नंतर मोठ्याप्रमाणावर पाणी साचत आहे, ते पाणी जाण्यासाठी तात्काळ बंदिस्त गटारी तयार करण्यात याव्यात. तसेच महामार्ग चार पदरी आहे, तो प्रत्यक्षात जो पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत आहे तो पर्यंत दोन्ही बाजूचा एक रस्ता विना खड्डा दुरुस्त व्हावा. रात्रीच्या वेळी महामार्गावर ज्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे त्या ठिकाणी फलक लावावेत.

अवजड वाहतुकी मुळे खड्डे पडेलेल्या नगर मनमाड महामार्गावर अपघात होवून प्रवाशांचा मृत्यु झाल्यास अ'नगर जिल्ह्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व सबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

नगर मनमाड महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटने तयार करण्यात यावा.

 नगर मनमाड महामार्गाचे काम जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक महामार्गावरून पूर्ण बंद करावी, सबंधित मागणी शुक्रवार दि. ३० ऑगष्ट २०२४ पर्यंत पूर्ण न केल्यास रविवार दि.०१ सप्टेंबर २०२४ रोजी राहुरी येथिल मुळा नदी पुलावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या आंदोलनात नगर मनमाड महामार्गाच्या लगतच्या गावांमधून नागरिक गुराढोरांसह, बैलगाडी, ट्रकटर, चारचाकी वाहनांसह सहभागी होतील, होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी हि संबधित प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी असेही म्हटले आहे . राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देताना आमदार प्राजक्त तनपुरे , देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम , राजूभाऊ शेटे , देवेंद्र लांबे , दीपक त्रिभुवन , अशोक तनपुरे. संदीप आढाव , पिंटू नाना साळवे आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments