तर मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडणार
राहुरी ( प्रतिनिधी )
मुळा धरणाच्या पाणलोटतील पावसाचा मुक्काम सुरूच असल्याने आज सायंकाळी धरणसाठा 18 टीएमसी वर पोहोचला असून धरण 70 टक्के भरले . धरणाकडे 10 हजार 300 क्युसेकने सुरू असलेले आवकमध्ये सायंकाळी वाढ होत 14 हजार 806 क्युसेकने वाढलेली होती . परिणामी येत्या दोन दिवसात धरण साठ्यात झपाट्याने वाढ अपेक्षित आहे .
( संग्रहित फोटो )
संपलेल्या आज सायंकाळी संपलेल्या 24 तासात धरणात पाऊणटीएमसी पाण्याची आवक झाली , त्यातील आज संपलेल्या 12 तासात 424 दशलक्ष फूट विक्रमी आवक झाली. सायंकाळपर्यंतची आवक पाहता पुढील दोन दिवसात धरणसाठा 20 टीएमसी पार करेल , अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे .
( संग्रहित फोटो )
मागील वर्षी प्रमाणे यावर्षी जुलैत नव्याने धरणात पाणी दाखल झाले आणि याच महिन्यात धरण निम्मे भरले . आज अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा 18 टीएमसीवर गेला आहे तर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे .
( संग्रहित फोटो )
2020 - 21 ला धरण परिचलन सूची ( आर ओ एस ) नुसार 31 जुलै पर्यंत धरणात पाणीसाठा 76.61 टक्के अर्थात 19 हजार 920 दशलक्ष घनफूट ( पाणी पातळी 1800.60 ) इतकी झाली तर धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा अतिरिक्त विसर्ग धरणातून मुळा नदीपात्रात सोडण्याचे निर्देश आहेत . दोन वर्षांपूर्वी 15 जुलै 2022 ला मुळा धरण निम्मे भरले होते . मात्र 31 जुलै 2022 पर्यंत निर्देशित पाणीसाठा न झाल्याने धरणातून जुलै महिन्यातच नदीपात्रात पाणी सोडण्याचे स्वप्न भंग झाले होते .
( संग्रहित फोटो )
मागील वर्षीही धरण परिचलन सूचीच्या निर्देशाप्रमाणे धरणात तेवढा पाणीसाठा न जमा झाल्याने जुलै महिन्यातच मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडता आले नाही . या वर्षी वेगळी स्थिती दिसत आहे .
जलसंपदा विभागाच्या धरण परिचालन सूचीच्या निर्देशानुसार धरण साठा 15 ऑगस्ट पर्यंत २२ हजार ८१५ दशलक्ष घनफूट ( 88% ) 1 हजार 806 .30 फूट इतका झाल्यास धरणाकडे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मुळा नदी पात्रात सोडण्याचे निर्देश आहेत . आता 15 ऑगस्ट पर्यंत निर्देशित केलेला पाणीसाठा धरणात जमा झाल्यास अतिरिक्त पाणी सोडले जाणार असल्याचे संकेत आहेत .
जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही . डी . पाटील , शाखा अभियंता आर . जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली धरणाचे पूर नियंत्रण पातळी चा स्टाफ धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहे .
26 टीएमसी क्षमतेच्या जलसंजीवनी ठरलेल्या मुळाधरणातील पाणीसाठ्याकडे अवघ्या नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असते . याशिवाय मुळाधरण कधी ओव्हरफ्लो होणार ! याबाबतची उत्सुकता सर्वांनाच असते . आता राहुरीकरांसह नगर जिल्ह्यातील लोकांना 15 ऑगस्टची वाट नक्कीच पहावी लागणार आहे .
Post a Comment
0 Comments