राहुरी - शनिशिंगणापूर रेल्वे राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात
( संग्रहित फोटो )
काय होणार ? कधी होणार ? चर्चा सुरू
( संग्रहित फोटो )
राहुरी ( प्रतिनिधी )
( संग्रहित फोटो )
केंद्र सरकारच्या नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी अंतर्गत प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यस्तरीय लॉजिस्टिक धोरणाला मान्यता देत त्याचे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे .
( संग्रहित फोटो )
प्रख्यात समजल्या जाणाऱ्या शिर्डी आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांच्या मध्यवर्ती असणाऱ्या राहुरी तालुक्यात
राहुरी ते शनिशिंगणापूर नव्याने रेल्वे लाईन करण्याबाबत सर्वेक्षण नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आलेले आहे .
गेल्या दशकापासून राहुरीतून ते शनिशिंगणापूर मार्ग व्हावा , अशी मागणी होत आहे . केंद्र सरकार , राज्य शासन गेल्या तीन ते चार वर्षांपासून धार्मिक पर्यटन वाढावे , यासाठी अनेक प्रयत्न करत आहे . आता राज्य शासनाने लॉजिस्टिक धोरणाला मान्यता दिल्याने राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला आता चालना मिळण्याची शक्यता आहे .
मराठवाड्याला मध्य महाराष्ट्रातील नगर , पुणे , नाशिक जिल्ह्याला जोडण्यासाठी रस्ते , रेल्वे व हवाई मार्गांबाबत अनेक सर्वेक्षण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि सुरूही आहेत. त्यातच अवघ्या नगर जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा जगप्रसिद्ध अशा साईबाबांची शिर्डी आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर यांचे महत्त्व लक्षात घेता दौंड मनमाड या रेल्वे मार्गावरून शनिशिंगणापूरला जाण्यासाठी वेगळी रेल्वे लाईन ची मागणी करण्यात आली. यावर केंद्राच्या अर्थसंकल्पात 2021- 22 मध्ये राहुरी आणि शनिशिंगणापूर यांना जोडण्यासाठी नवी रेल्वे लाईन साठी आर्थिक तरतूद करावी असे सुचित केले होते.
त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी राहुरीतून शनिशिंगणापूर ला इंजिनिअरिंग व मार्ग सर्वेक्षण अशा 25 किलोमीटर अंतराचा सर्वेक्षणासाठी काही लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. याबरोबरच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई परळी वैजनाथ या रेल्वे मार्गासाठी 230 किलोमीटर अंतरा वरील भागात सर्वेक्षण याचाही समावेश होता .
राहुरी रेल्वे स्टेशन कडील देसवंडी , केंदळ व सोनई कडील काही गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूमी अभिलेख व ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण झालेले आहे. ही रेल्वे लाईन भविष्यात लवकरच झाल्यास राहुरी तालुका निश्चितच जगाच्या नकाशावर येईल .
सध्या दौंड मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू असून राहुरी रेल्वे स्टेशन लगत मुळा नदी च्या रेल्वे पुलाशेजारी दुसऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे . प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने एकूण 980 किलोमीटर लांबीचे 18 नवीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत . त्यात नगर जिल्ह्यातील राहुरी शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गाचा समावेश आहे . त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण झाल्यानंतर नगर जिल्ह्यात लॉजिस्टिक्स नोट्स मध्ये राहुरी शनिशिंगणापूर या 21 किलोमीटर मार्गाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने राहुरीला ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .
Post a Comment
0 Comments