मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी रफीक शेख
उपाध्यक्षपदी गोविंद फुणगे तर सचिव प्रसाद मैड
राहुरी ( प्रतिनिधी )
राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी रफिक शेख,उपाध्यक्षपदी गोविंदराव फुणगे, सचिवपदी प्रसाद मैड, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यपदी जेष्ठ पञकार संजय कुलकर्णी यांची तर जिल्हा कार्यकारणीवर विनितराव धसाळ,दत्ताञय तरवडे,अनिल कोळसे,बाळासाहेब रासणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली .
परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, पञकार हल्ला कृती समितीचे उत्तर नगर जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे, रियाजभाई देशमुख, जेष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, सय्यद निसरभाई, सुनील भाऊ भुजाडी,अकाश येवले,यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष विनितराव धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी जेष्ठ पञकार संजय कुलकर्णी,राहुरी तालुकाध्यक्षपदी रफीक शेख,उपाध्यक्षपदी गोविंदराव फुणगे, सचिवपदी प्रसाद मैड, सहसचिवपदी श्रीकांत जाधव आणि खजिनदारपदी प्रभाकर मकासरे,संघटकपदी बाळासाहेब कांबळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन सर्वश्री हेमंत मिसाळ, राजेंद्र आढाव, राजेंद्र परदेशी,मनिष पटेकर,बंडू म्हसे, शरद पाचारणे,मनोज साळवे,समर्थ वाकचौरे,समीर शेख,सुभाष आग्रे,शकुर तांबोळी,महेश कासार आदिंच्या निवडी करण्यात आल्या आहे.
नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उत्तर जिल्हा जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
Post a Comment
0 Comments