कांग्रेस पक्षाकडे अँड प्रकाश संसारे यांना श्रीरामपूर राखीव मतदारसंघात उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी
राहूरी ( प्रतिनिधी )
अँड प्रकाश संसारे यांना श्रीरामपूर राखीव मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याची मागणी संसारे यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेतृत्वाकडे व काँग्रेस समितीकडे केली आहे .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा भिम शक्तीचे अध्यक्ष व खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब व विभागिय अध्यक्ष भाऊसाहेब साठे सर यांचे नेतृत्वा खाली प्रदेश सरचिटनिस म्हनुन अँड प्रकाश संसारे काम बघतात .
अँड प्रकाश संसारे हे प्रसिद्ध वकील म्हणून कार्यरत असून राहुरी , अहमदनगर कोर्टमधे गेल्या २७ वर्षा पासुन वकिली व्यवसाय करतात तसेच नोटरी पब्लीक म्हणून समाजामध्ये चांगला संपर्क आहे .
पुर्ण श्रीरामपूर मतदार संघ त्यांच्या परिचीत असून मतदार संघाच्या समस्या माहीत आहे . देवळाली प्रवरा सारखे मोठे गाव त्यांच्या पाठीशी आहे . जन सामान्यात गोर गरीबांचे वकिल म्हणून परिचित आहे.
अँड प्रकाश संसारे हे गरिबांचे अनेक खटले मोफत लढले म्हणून प्रसिद्ध आहेत . अनेक सामाजिक अंदोलनात अग्रेसर व्यक्तीमत्व आहे 32 गावातील लोकांचा भक्कम पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू असून उच्च शिक्षीत समाजाचा पाठिंबा देखील जमेची बाजू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पाठीशी आहे .
त्यामुळे ह्या वेळेस 32 गावातील व श्रीरामपुर मतदार संघातील स्थानिक उमेदवार म्हणून वाढता पाठिंबा आहे . सर्व श्रीरामपूर मतदार संघात वकील मित्रांचे जाळे आहे. त्यामुळे अँड प्रकाश संसारे यांचे पारडे जड आहे व ते आमदार होतील याची खात्री अनेक मतदार देत आहेत स्थानिक उमेदवार हि त्यांची जमेची बाजू आहे .
काँग्रेस पक्ष नेतृत्वाने एडवोकेट प्रकाश संसारे यांना श्रीरामपूर राखीव मतदार संघातून विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी , अशी अशी मागणी देवळाली प्रवरासह राहुरी फॅक्टरी , टाकळीमिया , श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर , टाकळीभानसह अनेक भागातून संसारे यांच्या समर्थकांनी केली आहे .
Post a Comment
0 Comments