Type Here to Get Search Results !

पालिकेच्या अभ्यासिकेत स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करत मिळवले यश

 पालिकेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या दोघांची शासकीय सेवेत निवड



 राहुरी ( प्रतिनिधी )

 सामान्य कुटुंबातील शुभम ठोकळे आणि अंकुश साळवे या तरुणांनी राहुरी नगरपालिकेच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत शासकीय नोकरीत यश मिळवले आहे . त्यांच्या या यशाचे राहुरी शहरातून कौतुक होत आहे .

राहुरी शहरातील क्रांती चौक येथे राहणाऱ्या अंकुश सुरेश साळवे याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक सात मध्ये एस आर पी एफ मध्ये त्याची निवड झाली आहे . तर बुवासिंधबाबा गल्लीतील शुभम शिवाजी ठोकळे याची अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये चालक म्हणून निवड नुकतीच झाली आहे .

राहुरी शहरातील आझाद चौकालगतच राहुरी नगर पालिकेच्या वाचनालय इमारतीमध्ये गेल्या अनेक काळापासून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य व माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे , आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे .

 राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा रात्रंदिवस अभ्यास करत असतात . या ठिकाणी काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी विद्यार्थ्यांची चिकाटी आणि होणारा अभ्यास शहरात नेहमीच चर्चेत राहिलेला आहे . शहरातील गोल्डन ग्रुपच्या वतीने या आपल्यासिकेत युवा नेता हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील झालेला आहे . या अभ्यासिकेतील अंकुश साळवे व शुभम ठोकळे या दोघांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचे राहुरी शहरातून कौतुक केले जात आहे .

Post a Comment

0 Comments