Type Here to Get Search Results !

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले



राहुरी  ( प्रतिनिधी )

 पावसाने ओढ दिलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी जलसंपदा विभागाने मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी रात्री पाणी सोडले .



15 ऑगस्ट पर्यंत मुळा धरणातून पाणी सोडण्याच्या धोरणानुसार नदीपात्रात पाणी सोडले. लाभक्षेत्रातील राहुरी नेवासा पाथर्डी शेवगाव तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांसह चारा पिके धोक्यात आलेली होती . लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संबंधीत लोकप्रतिनिधी , जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याकडे दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती .

 राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत आंदोलनाचा इशारा देखील दिला होता . राज्य सरकारमधील पदाधिकाऱ्यांनीही यात लक्ष घातले होते . अखेर जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाकडून शुक्रवारी रात्री मुळा डावा कालव्यातून शंभर क्युसेकने तर उजव्या कालव्यातून 500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 

कालव्यातून पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे .

Post a Comment

0 Comments