राहुरीतील मुळा नदीत मातीचा भराव टाकणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी
राहुरी - ( प्रतिनिधी )
मुळा नदी पात्रात मातीचा भराव टाकणार्या ठेकेदार व संबधित बांधकाम एजन्सीवर नगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकानी , मुळा पाटबंधारे विभागाने त्वरीत कायदेशीर कारवाई करावी , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
नगर पालिकेच्या मालकीचे असलेल्या ज्ञानेश्वर उद्यानात शहरातील भूमिगत गटारीच्या सांडपाणी शुद्धीकरण करण्या साठी साठवण टाक्याचे बांधकाम चालू आहे .
या कामातून निघालेली माती मुळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात टाकण्याचे काम सुरू आहे. पावसाळा चालु असल्याने मुळा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे . भविष्यात मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे .
मुळा नदीच्या पात्रात लहान पुला जवळ ठेकेदाराने माती टाकून पात्रात भराव टाकण्याचे काम करीत आहे . मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात मुळा नदीच्या पात्रात पाणी सोडल्यास पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाण्याचा फुगवटा तयार होऊन मोठ्या पुला जवळील शेतीत पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे .
पुढील परिस्थिती माहिती असूनही मुळा नदी पात्रात मातीचा भराव टाकणाऱ्या संबंधित प्रकल्पाच्या एजन्सीवर जलसंपदा विभाग आणि नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Post a Comment
0 Comments