Type Here to Get Search Results !

महंतांच्या समर्थनार्थ मृदुंगाच्या तालावर निघाला मोर्चा

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ राहुरीत टाळ मृदुंगाच्या तालावर निघाला मोर्चा



राहुरी  ( प्रतिनिधी )




महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातून टाळ मृदूंगाच्या निनादात तहसिल कचेरीवर मोर्चा आज काढण्यात आला .





राहुरी शहरातून भजन कीर्तनाचा टाळ मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय , भारत माता की जय , अशा घोषणा देत तहसील कचेरीवर मोर्चा आणला .



यावेळी तालुक्यातील हिंदू समाज सहभागी झाला .


नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताह मध्ये सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते . 



१५ ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी कथित वादग्रस्त विधान केले. 

आपल्या प्रवचनांमध्ये मोहम्मद पैगंबराच्या वैयक्तिक आयुष्य विषयी टिप्पणी केली, तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचे आवाहनही केले होते . रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठीकठिकाणी त्याचे पडसाद उमटले . मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली . काही ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी राहुरी शहरातील आनंदऋषी गार्डन येथून मोर्चा निघाला . राहुरी शहरातून भजन कीर्तनाचा टाळ मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय , भारत माता की जय , अशा घोषणा देत तहसील कचेरीवर मोर्चा आणला . तहसील कचेरी समोर राजेश्वरानंद महाराज कुऱ्हे, आदिनाथ महाराज दुशिंग, अर्जुन महाराज तनपुरे, संपत महाराज जाधव, पोपट महाराज कुसमुडे, बाबा महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
त्या नंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार सचिन औटी यांना निवेदन देण्यात आले . सूत्र संचलन प्रसाद बानकर यांनी केले . यावेळी मोर्चाच्या वेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकल हिंदू समाजाने आवाहन केल्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील बहुतांश गावातून नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला .

नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताह मध्ये सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते . १५ ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी कथित वादग्रस्त विधान केले. आपल्या प्रवचनांमध्ये मोहम्मद पैगंबराच्या वैयक्तिक आयुष्य विषयी टिप्पणी केली, तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचे आवाहनही केले होते . रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठीकठिकाणी त्याचे पडसाद उमटले . मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली . काही ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी राहुरी शहरातील आनंदऋषी गार्डन येथून मोर्चा निघाला . राहुरी शहरातून भजन कीर्तनाचा टाळ मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय , भारत माता की जय , अशा घोषणा देत तहसील कचेरीवर मोर्चा आणला . तहसील कचेरी समोर राजेश्वरानंद महाराज कुऱ्हे, आदिनाथ महाराज दुशिंग, अर्जुन महाराज तनपुरे, संपत महाराज जाधव, पोपट महाराज कुसमुडे, बाबा महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
त्या नंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार सचिन औटी यांना निवेदन देण्यात आले . सूत्र संचलन प्रसाद बानकर यांनी केले . यावेळी मोर्चाच्या वेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकल हिंदू समाजाने आवाहन केल्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील बहुतांश गावातून नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला .


Post a Comment

0 Comments