सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे राहुरी तालुक्यात जल्लोषात स्वागत
देवळाली प्रवरा - श्रीकांत जाधव ( वरिष्ठ पत्रकार )
सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील सोसायटी डेपो चौकात बुधवारी सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे .
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे पार पडलेल्या योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज सप्ताह प्रवचनात महंत रामागीरीजी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधानानंतर महंत रामगिरी यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवानी ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी त्यांचे सर्वत्र जल्लोषात स्वागत होत आहे.
आज अहमदनगर येथून महंत रामगिरी महाराज सराला बेटकडे जात असताना देवळाली प्रवरा शहरात सोसायटी डेपो चौकात टाळ मृदुंगाच्या गजरात, डीजेच्या निनादात, जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत, राम नामाच्या जयोघोषात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी महंत रामगिरी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला. देवळाली प्रवराचे स्वागत स्वीकारून महंत रामगिरी क्षेत्र सरला बेटाकडे मार्गस्थ झाले. महंत रामगिरी महाराज त्यांच्या ताफ्याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. यावेळी वारकरी, टाळकरी, हरिभक्त परायन मंडळी व सकल हिंदू समाज बांधव व देवळाली प्रवरा शहरवासीय मोठ्या संख्यने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments