भंडारदर्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने मुसळवाडी तलाव भरा
राहुरी ( प्रतिनिधी )
मुसळवाडी तलाव भंडारदारा धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे .
ब्रिटिशकालीन मुसळवाडी तलाव पूर्वी पासून भंडारदारा धरणाच्या ओव्हरफ्लो च्या पाण्याने भरण्याची आजपर्यंतची प्रथा असून भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या वाटपात राहुरी तालुक्याच्या वाट्याला १५ टक्के पाणी मिळाले असून सदर आमच्या हक्काचे १५ टक्के पाण्यातून मुसळवाडी तलाव तातडीने भरून देण्यात यावा. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सद्या प्रवरा नदी पात्रात सोडले जात आहे तसे या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून तातडीने भरून देण्यात यावे अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली.
मुसळवाडी तलावातील पाण्यातून राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे सुमारे २० ते २५ गावांना जल संजीवनी देणारा आहे.मुसळवाडी तलावाची जल साठवण क्षमता १८९ एमसीएफटी घनफूट असून आज अखेर ३५.८१ दशलक्ष घनफूट म्हणजेच अवघा १९ टक्के नीचांकी जलसाठा शिल्लक आहे. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून निळवंडे धरणही भरण्यात जमा आहे. तसेच मुळा धरणाचा जलसाठाही ७५ टक्केच्या पुढे जाणार असल्याने मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी पूर्व भागातील ग्रामस्थांनी संबंधित पाटबंधारे विभागाकडे केली आहे. तलावाने तळ गाठल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून मुसळवाडी तलाव दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्ण क्षमतेने भरण्याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या भागातील मुसळवाडी, टाकळीमिया, मोरेवाडी, महाडक सेंटर, लाख, दरडगाव, जातप, त्रिंबकपूर, मालुंजे खुर्द, महालगाव, माहेगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, तिळापूर,राहुरीच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी कोपरे, बोरीफाटा, वांजुळपोई,आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून शेतकरी आपले वर्षभराचे शेती पिकांचे नियोजन करीत असतात, सध्या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरून निळवंडे धरणही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरी संबंधित पाटबंधारे विभागाने मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरुन देण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली.
Post a Comment
0 Comments