Type Here to Get Search Results !

मुळाधरणातून आज पुन्हा पाण्याचा विसर्ग

 मुळा धरणातून पुन्हा नदीपात्रात पाणी



सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त 


                         (संग्रहित फोटो आहे )

नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने तसेच मुळा धरणाच्या जवळच्या क्षेत्रातही पर्जन्यवृष्टी झाल्याने जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार आज सकाळी नऊ वाजता नदीपात्रात 1 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

 नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

काल शुक्रवारी मुळा धरण क्षेत्रात तब्बल पाच इंचाहून अधिक पाऊस नोंद झाला तर कोतुळकडील मुळा नदीतून धरणाकडे 1 हजार 500 क्युसेकने आवक सुरू होती .

आज सकाळी मुळा धरण साठा साडे चोवीस टीएमसी वर पोहोचला 24 तासात पाहून टीएमसी पाणी धरणात जमा झाले .

 जलसंपदा विभागाचा 

जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही . डी . पाटील , शाखा अभियंता आर . जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली धरणाचे पूर नियंत्रण पातळी चा स्टाफ धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहे .

Post a Comment

0 Comments