Type Here to Get Search Results !

मुळा धरणावरील विद्युत रोषणाई पहाच

 विद्युत रोषणाईने मुळा धरण परिसर नटला पर्यटकांचा ओघ सुरू



 राहुरी   ( प्रतिनिधी )



स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मुळा धरणाच्या अकरा दरवाजांवर जलसंपदा विभागाच्या वतीने


 विलोभनीय अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .



जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या नियोजनाखाली  उपविभागीय अभियंता व्ही . डी . पाटील , शाखा अभियंता आर . जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली धरणाचे पूर नियंत्रण पातळी चा स्टाफ धरणाच्या सेवक वर्गाकडून हे सर्व नियोजन करण्यात आले .

 मुळा धरण भरल्यावर जिल्ह्यातील पर्यटकांचा विशेषतः नगर शहर उपनगर राहुरी पाथर्डी शेवगाव आदी भागातून मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ सुरू होतो . 

मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याच्या दुग्ध शर्करा योगाच्या पार्श्वभूमीवर धरणावर केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची ओढ धरणाकडे लागल्याचे चित्र दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments