राहुरी विधानसभा उमेदवारी विसंवादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्ह्य़ात
राहुरी - विशेष राजकीय वृत्त
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नगर जिल्ह्यात प्रवेश करत असतानाच राहुरीतील विधानसभेच्या उमेदवारी बाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे .
राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील पारंपारिक लढतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उडी घेत आपल्याच पक्षाचा उमेदवार विधानसभेसाठी उभा करण्याचे काही स्थानिक पुढाऱ्यांनी नुकतेच सुतोवाच केले . लगेचच भा.ज.प.च्या स्थानिक नेत्यांनीही राहुरीची जागा भाजपची असल्याचे ठणकावत जाहीर केले . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेच्या नगर जिल्ह्यातील दौर्याच्या पार्श्वभूमीमुळे अजित पवार गटाचे नेत्यांची गोची झाल्याची चर्चा होत आहे.एकीकडे शरद पवार पक्षाचे ( तनपुरे गटाचे ) राहुरी मतदार संघात राजकीय पारडे जड असताना सध्याच्या महायुती सरकारमधील अजित पवार पक्ष आणि भा.ज.प. यांच्यातील विसंवाद उघड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे .
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्थानिक पुढार्यांनी आपला उमेदवार देणार असल्याचे सुतोवाच करताच भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही राहुरीची जागा भाजपची असल्याचे जाहीर केले .
आधीच भाजपने राहुरी मतदार संघात लोकसभेच्या उमेदवाराला जास्तीची 16 हजार मत मिळाल्याने "लक्ष्य" केले आहे . त्यासाठी जिल्हा व प्रदेश पातळीवरील अनेक नेत्यांनी राहुरीकडे लक्ष घातलेले आहे .
त्यातच महायुतीतील भाजपाने हक्क सांगितलेल्या राहुरीत अजित पवार गटाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आपली उमेदवारी असल्याचे सांगितल्याने भाजपाकडून राहुरीच्या जागेवर हक्क सांगितला आहे . राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची राहुरीत गोची झाल्याची चर्चा राहुरी - नगर - पाथर्डी मतदारसंघातील मतदारांमध्ये होत आहे .
अजित पवार यांची जन सन्मान यात्रा येत्या दोन दिवसातच शिर्डी येथे येत असल्याने राहुरीच्या विधानसभा उमेदवारी बाबत अजित पवार गटाच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या वक्तव्यांबाबत नक्कीच चर्चांना उधाण आले आहे .
सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटाचे राहुरीत वर्चस्व असून त्यांच्या विरोधातील काही गट सातत्याने त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी कायम प्रयत्नात असतात असे सांगितले जाते . राष्ट्रवादी फुटी अगोदर देखील अजित पवार गटाच्या नेत्यांच्या अनेक हालचाली राहुरीत सुरुच होत्या . 2009-10 , 2014-15 विधानसभा निवडणुकीदरम्यान याच अजित पवार गटाच्या काही कथित स्थानिक पुढाऱ्यांनी राहुरीत प्राबल्य असलेल्या तनपुरे यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. आता काय होते याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे .
Post a Comment
0 Comments