निळवंडेतून जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू ; मुळा धरणातही पाण्याची मोठी आवक सुरू
( संग्रहित फोटो )
राहुरी - विशेष वृत्त
मुळा , भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरूच असल्याने भंडारदरा धरणातून निळवंडेकडे तब्बल 27 हजार 114 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून निळवंडे धरणातून प्रवरा नदीतून जायकवाडी कडे 7 हजार 320 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या अकोले संगमनेर राहुरी नेवासा तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . निळवंडे धरणातून प्रवरा नदी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत नेवासा तालुक्यात पोहोचण्याची शक्यता आहे .
दरम्यान मुळा पाणलोट क्षेत्रातही तुफानी पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने मुळा धरणाकडे येथील मुळा नदीतून तब्बल 23 हजार 721 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती . कोतुळकडील मुळा नदीला पूर आला आहे . परिणामी आज सकाळी मुळा धरण साठा साडेअठरा टीएमसी वर पोहोचला . आवक अशीच सुरू राहिल्यास लवकरच तांत्रिकदृष्ट्या मुळा धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जाणकारण कडून व्यक्त केली जात आहे . धरणांच्या पाणलोटात पाऊस होत असला तरी लाभ क्षेत्रातील सर्वच भागांमध्ये पावसाने ओढ दिली असून ढगाळ वातावरण मात्र कायम आहे .
🩸 *सतर्क खबरबात जिल्ह्याची* 🩸
Prasad Maid - 8380091497
Post a Comment
0 Comments