Type Here to Get Search Results !

हुश्य..S..SS.. जायकवाडीचा साठा गेला 66% च्या पुढे !!

 हुश्य..S..SS.. जायकवाडीचा साठा गेला 66% च्या पुढे !!



 यंदा समन्यायीचे भूत नगर नाशिकच्या मानगुटीवर नाही बसणार

राहुरी - प्रसाद मैड यांजकडून


( सतर्क खबरबात जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी Prasad Maid यांच्या युट्युब ला लगेच सबस्क्राईब करा )

नगर , नाशिक जिल्ह्यातील धरणा क्षेत्रातील जोरदार पावसामुळे जायकवाडीचा पाणीसाठा आज सायंकाळी 66 टक्क्यांच्या पुढे सरकला असून नगर नाशिकच्या मानगुटीवर बसलेले समन्यायीचे भूत यावर्षी त्रासदायक ठरणार नाही . यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातून वरूण राजाचे आभार मानले जात आहे .

दरम्यान प्रसिद्ध जल अभ्यासक सेवानिवृत्त अभियान हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या विशेष माहितीप्रमाणे जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 65 टक्के च्या पुढे म्हणजेच 50 टी.एम.सी.च्या पुढे गेलेला आहे . त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा-२००५ नुसार जायकवाडी धरणात यापुढे पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही .

अद्याप पावसाळा संपलेला नसून याप्रमाणे पाऊस सुरू राहिला तर कदाचित सप्टेंबर मध्येच जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने (१०२.७३ टीएमसी ) भरण्याचा अंदाज आहे .        

जायकवाडी धरणाचा एकूण साठा ७७.२२ टीएमसी/ (७५.१७%) तर उपयुक्त::५१.१५ टीएमसी/ (६६.७३%) इतकाझालाआहे .                             

जायकवाडीत अ. नगर व नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा---- ६७६६ आढळा -------७८३ भोजापूर ------९९०. ओझर--------१०५२ कोतुळ--------४२२७ मुळा धरण----६००० नांदूर मधमेश्वर (गोदावरी)-----२७३४१ सुरू असल्याची माहिती देखील जल अभ्यासक हरिश्चंद्र र चकोर यांनी दिली .

Post a Comment

0 Comments