हरवलेले अडीच लाखाचे तब्बल 23 मोबाईल जप्त करून दिले मूळ मालकाला
राहुरी पोलीस स्टेशनची धडक कार्यवाही
राहुरी ( प्रतिनिधी )
23 तक्रारदारांचे विविध ठिकाणी गहाळ झालेले हरवलेले अडीच लाखांचे मोबाईल नुकतेच राहुरी पोलिसांनी जप्त केले व मूळमालकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच देण्यात आले .
राहुरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे
राहुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार, बसस्टॅन्ड इतर गर्दिच्या ठिकाणाहुन गहाळ झालेले मोबाईल फोनची गहाळ रजिस्टरला नोंद घेवुन अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईल बाबत अधिक माहिती संकलीत करुन नगर उत्तर सेल पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आहे वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेवुन आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करुन श्री.डॉ. बसवराज शिवपुजे सो , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकुण २३ मोबाईल फोन एकुण किंमत २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमालाचा शोध घेवुन मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा.श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग व श्री. डॉ. बसवराज शिवपुजे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोहेकॉ/६०८ सुरज गायकवाड, पोहेकॉ/१३७९ राहुल यादव, पोना/६८१ प्रविण बागुल, पोकॉ/५२८ प्रमोद ढाकणे, पोकॉ/९२३ सतीष कुऱ्हाडे, पोकॉ/५४१ सचीन ताजणे, पोकॉ/९७८ अंकुश भोसले, पोकॉ/१२९१ नदिम शेख, पोकॉ/२४५३ गोवर्धन कदम यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments