राहुरीच्या गौतम गणेश मंडळात राहुरीच्या गौतम गणेश मंडळात चा देखावा ठरले राहुरीकरांचे आकर्षण
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरातील जैन मंदिर परिसरातील गौतम गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील जनजातीच्या लढवय्यांचे माहिती फलक देखावा सादर केला आहे .काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची यानिमित्ताने माहिती मिळाल्यामुळे मिळाल्याने हा देखावा गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरला आहे .
(Advt)
बाजारपेठेतील जैन मंदिर परिसरातील गौतम गणेश मंडळाची पंधरा वर्षांपूर्वी स्थापना झाली आहे .
मंडळातील लहान मोठ्या सदस्यांबरोबरच महिला सदस्यांचाही यात हिरीरीने सहभाग राहिलेला आहे . सरस्वती महिला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी महिला सदस्य नवरात्र उत्सव साजरा करतात .
गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या काळात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात . यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊन शहीद झालेल्या विविध जनजाती आदिवासी भागातील स्वातंत्र्य लढवय्यांची छायाचित्रासह माहिती फलक देखावा म्हणून सादर केला आहे . हा देखावा राहुरी शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे . मंडळाच्या वतीने या परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे . मंडळाच्या वतीने लहान सदस्यांचे फोटोंचे बॅनर देखील लक्ष वेधून घेत आहेत . पर्यावरण पूरक असे गणेशोत्सव साजरा करण्याकडे या मंडळाचा कल आहे . देखावा पाहण्यासाठी नागरिक विशेषता महिलांची उपस्थिती दिसून येत आहे
Post a Comment
0 Comments