राहुरी रेल्वे स्टेशनच्या या कामामुळे रेल्वेमार्गात तात्पुरता बदल
राहुरी ( प्रतिनिधी )
पुणे विभागातील दौंड मनमाड दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे . या मार्गावरील राहुरी - पढेगाव स्थानकांवरील नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे चार गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे .
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयाने तसे जाहीर केले आहे तात्पुरत्या बदल करण्यात आलेल्या कार्यांमध्ये निजामाबाद पुणे दौंड निजामाबाद नांदेड पुणे आणि पुणे नांदेड या गाड्यांचा समावेश असून 21 22 23 सप्टेंबर या काळात या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत सध्या नगर वांबोरी राहुरी पडेगाव या रेल्वे मार्गात वर दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे राहुरीतील मुळा नदीवरील रेल्वे मुलाचेही काम प्रगतीपथावर आहे
Post a Comment
0 Comments