Type Here to Get Search Results !

धनगर आरक्षणासाठी मेंढ्यांसह रस्त्यावर उतरला सकल धनगर समाज ; राहुरीतील रस्ता रोकोत आणल्या मेंढ्या

 धनगर आरक्षणासाठी मेंढ्यांसह रस्त्यावर उतरला सकल धनगर समाज ; राहुरीतील रस्ता रोकोत आणल्या मेंढ्या


राहुरी ( प्रतिनिधी )


धनगर समाजाला आरक्षण मिळाव या मागणीसाठी पंढरपूर येथे दहा दिवसांपासून बसलेल्या सहा धनगर बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल धनगर समाजाच्या वतीने राहुरीत नगर मनमाड रस्ता रोखण्यात आला .

 यावेळी धनगर बांधवांनी बैलगाडीसह घोडा आणि मोठ्या संख्येने मेंढ्या आंदोलनात उतरवल्या होत्या . राहुरीतील बाजार समिती समोरील नगर मनमाड रस्त्यावर राहुरी तालुक्यातील सकल धनगर समाज उपोषणार्थी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी एकवटल्याचे चित्र दिसून येत होते .

गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील सहा योद्धे धनगर समाजाचे बांधव धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी आज सकल धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे . 

यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या .

Post a Comment

0 Comments