राहुरीतील रेडिओ एफएम पोहोचला लाखो लोकांपर्यंत
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी सारख्या ठिकाणी रेडिओ केंद्र आहे आणि तेही वर्षभरात नऊ लाख पर्यंत पोहोचले !
तुम्हाला विश्वास बसणार नाही , पण होय खरं आहे . महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले कृषी वाहिनी हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन असून वर्षभरात लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे .
सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या 90.8 एफएम वर रात्री दहा वाजेपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची , गीतांची रेलचेल सुरू असते . जुन्या मराठी हिंदी गीतांबरोबरच दिवसभरात कृषी विषयक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यावर आधारित कार्यक्रम कृषी विद्यापीठातील या कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या शंभर फूट टॉवरमुळे नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेकडो गावांपर्यंत फुले कृषी वाहिनी पोहोचली आहे . रेडिओ वाहिनीचे देखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे . याबरोबरच यूट्यूब चैनल देखील आहे .
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर वाहिनीशी संपर्क करतात संबंधित तज्ञ शास्त्रज्ञांचे सल्ला व मार्गदर्शनही घेतले जात असल्याने या एफ एम रेडिओ स्टेशनची विश्वासार्हता वाढतच आहे .
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यातील फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये असे रेडिओ स्टेशन सुरू केले आहे , त्याला प्रतिसाद वाढत आहे.. एवढेच नव्हे तर विविध व्यावसायिक , खाजगी संस्था , वाणिज्य संस्था शैक्षणिक संस्था यांच्या जाहिराती देखील अल्प मूल्यांमध्ये प्रसारित होत असल्याने फायदेशीर ठरते आहे . आता लवकरच वर्षपूर्ती होत असल्याने राहुरीची म्हटली जाणारी फुले कृषी वाहिनी रेडिओ स्टेशन आता नक्कीच अभिनंदनीय ठरत आहे .
Post a Comment
0 Comments