दहा वर्षात राहुरीत 46 हजार मतदार वाढले ; मतदान वाढीसाठी तरुणाईकडे लक्ष
राहुरी ( प्रतिनिधी )
गेल्या दहा वर्षांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये 46 हजार मतदारांची वाढ झाली असून त्यात तुलनेत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा तब्बल 3 हजारने अधिक आहे .
कोणत्याही निवडणुका असो त्यात महत्त्वाचं असतो तो मतदान आणि मतदार . निवडणुका हा विषय नेहमीच रंगतदारपणे चर्चिला जातो , असाच चर्चेत असणारा विषय म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ .
तीन तालुक्यांमध्ये समावला गेलेला 223 राहुरी विधानसभा मतदारसंघ . 302 मतदान केंद्र असलेल्या राहुरी विधानसभा मतदार संघाची 30 ऑगस्ट 2024 अखेर अंतिम मतदार यादीतील संख्या तीन लाख 17 हजार 464 इतकी असून त्यात एक लाख 65 हजार 275 पुरुष मतदार तर एक लाख 52 हजार 188 इतकी महिला मतदारांची संख्या आहे .
गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत 46 हजार 129 मतदार वाढले आहेत , त्यात 21 हजार 636 पुरुष मतदार तर 24 हजार 498 महिला मतदारांची संख्या वाढली आहे . पाथर्डी , नगर आणि राहुरी तालुक्यातील गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात 2014 या वर्षात दोन लाख 71 हजार 335 मतदार संख्या होती तर 2014 मध्ये 69 टक्के मतदान झाले होते . 2019 या वर्षात झालेल्या मतदार संघाची दोन लाख 91 हजार 474 मतदार संख्या होती , 2019 मध्ये 71 टक्के मतदान झाले होते . या वर्षी येत्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीत मतदान व मतदार महत्त्वाचे ठरणार आहे.
1962 पासून प्राप्त विधानसभेची माहिती पाहता 1962 मध्ये व 1967 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उमेदवार विजयी झाला होता. 1972 मध्ये कम्युनिस्ट पार्टी तर 1978 1980 1985 1990 1995 1999 या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उमेदवार , 2004 मध्ये भारतीय जनता पक्ष , 2009 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे . तर मागील वेळी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे .
यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या वाढलेली असली तरी वाढलेले मतदार हे सर्व तरुण वर्गातील असल्याने आणि सध्याचा राज्यातील व देशातील वातावरण पाहता या मतदारां ंना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांसोबतच भारतीय निवडणूक आयोग , राज्य निवडणूक आयोगाने आणि विविध सामाजिक संघटनांकडून मतदार जागृती आणि अधिकाधिक मतदान करण्यासाठी विविध उपक्रम केले जात आहेत . यंदाच्या वर्षी मतदानाचा टक्का वाढणार काय ? याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे .
Post a Comment
0 Comments