राहुरी पालिका प्रशासनाला आली जाग ; धूर व औषध फवारणी सुरू
राहुरी ( प्रतिनिधी )
गेल्या महिनाभरापासून राहुरी शहर व परिसरात डासांचा डासांच्या प्रादुर्भावाने राहुरीकर वैतागले असताना राहुरी पालिका प्रशासन उशिरा जागे होत
सध्या डासांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी व फॉगिंग तसेच औषध फवारणी शहर व परिसरात सुरू केली आहे .
गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानंतर राहुरी शहरातील विविध विविध प्रभागांमध्ये उपनगरीय भागात गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला होता वाढलेला आहे . त्यामुळे शहरवासी ंमध्ये विविध साथीच्या आजारांना डेंग्यू ताप आदी आजारांना निमंत्रण द्यावे लागले .
मोठ्या प्रमाणात विविध दवाखाने हॉस्पिटलमध्ये नागरिक विशेषतः महिला व मुली, मुले दाखल होत असल्याचे चित्र दिसून आले . नागरिकांनी अनेक वेळा राहुरी नगरपालिका प्रशासनाला तात्काळ धूर फवारणी औषध फवारणीची मागणी केली होती . मात्र अद्याप टेंडर निघाले नसल्याचे मोघम उत्तर नागरिकांना पालिका प्रशासनाकडून मिळत असे .
आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या पालिकेत सांगून अनेक सत्ताधारी व विरोधातील नगरसेवक ही वैतागले होते . अखेर टेंडर निघतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन फॉगिंग मशीन व दोन औषध फवारणी युनिट सुरू झाले असून शहरातील विविध गल्लीत बोळांमध्ये प्रभागांमध्ये हे फवारणी सुरू असल्याचे चित्र आहे .
अखेर प्रशासक असणाऱ्या राहुरी नगर पालिका प्रशासनाला उशिराना उशिरा का होईना जाग आल्यामुळे आल्याबद्दल नागरिकांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे .
Post a Comment
0 Comments