सातासमुद्रापलीकडे प्रथमच लंडन येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन
शिवतंत्र परिवाराचे विश्वशिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी दिला संदेश
पुणे ( विशेष प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ मठ मोशी (पुणे) येथील श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुका दर्शन सोहळा स्लाव लंडन येथे आनंदात पार पडला.
स्लाव मित्र मंडळ स्लाव (लंडन) UK यांच्या वतीने दि. २१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी चरण पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता.आखिल भारतीय बांधवांना संताचे विचार आचार श्री स्वामी समर्थ नामाचे महत्त्व त्यांच्या नामाचा प्रचार करण्यासाठी व हींदु संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
सातासमुद्रापलीकडे प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकांचा सोहळा संपन्न झाला.अशी माहिती श्री स्वामी समर्थ मठ मोशीचे मठाधिपती श्री.संतोष कुलकर्णी (काका माउली) यांनी दिली.
१८ सप्टेंबर रोजी श्री.स्वामी समर्थ मठ मोशी येथुन पारंपरिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ मठ मोशी ते ग्रामदैवत नागेश्वर मंदिर मिरवनुक पार पडली. यावेळी बहूसंख्य ग्रामस्थही उपस्थित होते. सचिन काटे व गौरी ताई यांनी संबंळाच्या वादनाने आरती करून सेवा केली. मोशी येथील नागेश्वर नवयुग इंग्लिश स्कुल च्या संचालिका वैशालीताई आल्हाद व त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.यावेळी मठातील महीला हरिपाठ मंडळ,व मठावरील सेवक आणि *जेष्ठ अभिनेते मोहन जोशी* प्रांताधिकारी *श्री.अनिलजी दौंड*, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त मा.श्री.राजेंद्र उमप ,*देहु संस्थान चे अध्यक्ष.ह.भ.प.नितिन महाराज मोरे*, अभिनव फार्म चे *ज्ञानेश्वर माऊली बोडखे* नगरसेविका *सौ. अश्विनीताई जाधव*,*सौ.सारीका बोर्हाडे*,*अंकुश मयेकर*,*गणेशशेठ हस्ते* *एडवोकेट नरेंद्र निकम* *सौ वैशाली अल्हाट* *दिलीप पुंडे* *दिलीप रोकडे* *मोहन साळवी* आदी मान्यवर उपस्थित होते. निलेश बोराटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सेंद्रिय शेतीचे जादुगार अभिनव फार्मचे संचालक *ज्ञानेश्वर माऊली बोडके* यांच्यावतीने सेंद्रिय शेतीतून तयार करणारे विषमुक्त अन्न त्यातून निर्माण होणारे विष मुक्त आरोग्यदायी शरीर व मशागत काळी माती यांच्या प्रेरणेतून विष मुक्त शरीरापासून *साधना आणि ध्यान* यातून मिळणारा मनावरील ताबा . या संकल्पनेचा जगभर प्रसार होण्यासाठी संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणार असल्याचा संकल्प जाहीर केला. आयुष मंत्रालय (भारत सरकार) यांचे तांत्रिक सल्लागार *श्री साहेबराव मेंगडे* यांच्या हस्ते यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक रोपाचे वाटप केले. त्यावेळी *ह भ प तळपे महाराज*, *ह भ प गुलाब महाराज राक्षे* *ह भ प कैलास महाराज नाईक*, *ह भ प भीमराज महाराज हांडे* , *ह भ प विठ्ठल महाराज गव्हाणे*, आणि संस्थेचे विद्यार्थी सहभागी होते.
*संजय नरोडे साहेब*, *खासदार डॉ. अमोल कोल्हे*, *कालीचरण महाराज*, *अरुणादेवी पिसाळ* , *सुरेश भाटे*, *आमदार सुनील टिंगरे*,शिवतंत्र परिवाराचे विश्वशिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी संदेश दिला.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी लंडन येथे स्लाव मित्र मंडळाचे विश्वस्त *मंदार मिरासे*, *आदेश देसाई*, *निलेश देशपांडे*, *सागर कुलकर्णी*, *सागर खिंडारे* , व परिवार यांनी जयघोषामध्ये पारंपारिक वाद्यामध्ये ढोल ताशा लेझीम या सह स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांनी केलेल्या नाम गजरामुळे आसमंत दुमदुमला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन पादुकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत महाअभिषेक पार पडला . त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. शेवटी शेकडो भक्तांनी लाभ घेतला. दुपारनंतर विविध महिला भजनी मंडळांनी भजन सादर केले.
सायंकाळी सात वाजता महाआरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी सकाळी महाअभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भक्ती बाई गजराने स्वामी चरित्राचे प्रबोधन काका माऊलींनी केले . दिवसभर लंडन मधील महिला भगिनींनी भजन केले. त्यानंतर सेंद्रिय शेती संकल्पची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर स्लाव मित्र मंडळाचे विश्वस्त यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेम व उपरणं देऊन सन्मान केला. त्यानंतर काका माऊली यांनी आई-वडील व संतांचे महत्त्व सांगून प्रबोधन केले. यावेळी स्वामी समर्थ मठ मोशी येथील *मठाधिपती संतोष कुलकर्णी काका माऊली* यांनी १०० पौंड लंडन येथील स्लाव मित्र मंडळाला दिले.
लंडन येथील स्लाव मित्र मंडळाचे विश्वस्त आनंद पंडीत,योगी चव्हाण, सचिन नेमानेसर्वांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments