राहुरीतील या भव्य रॅलीला मिळाला मोठा प्रतिसाद
राहुरी ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज शहरात भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार अमोल कोल्हे , राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे सहभागी झाले .
यावेळी रॅलीतील मोटारसायकलींवर पक्षाचे झेंडे आकर्षण करून घेत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवार आज ( शुक्रवार ) पांडुरंग लॉन्स राहुरी येथे आयोजित करण्यातआली .
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे ,खासदार नीलेश लंके,कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली गुरूवारी दिली . आज राहुरीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी रॅली पूर्वी प्राजुक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली .
या यात्रेचा उद्देश वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, या यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे . पक्षाचे वरिष्ठ नेते युवा वर्गाशी संवाद साधणार असल्याने या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले . मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शहरातील या भव्य रॅली चर्चा होत आहे .

Post a Comment
0 Comments