भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीची प्रतिमा शासकीय कार्यालयात भेट
राहुरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदा भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतारदिन कार्यक्रमाचा नव्याने समावेश केला आहे .
महानुभाव पंथाचे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचा ८०३ वा आवतार दिन दि.५सप्टेबर रोजी सार्वत्रिक स्वरुपात संपन्न होत आहे .त्याला अनुसरून महानुभाव शिक्षण संस्था,वांबोरीचे संस्थापक/ संचालक - प.पु.प.म.गुरुवर्य आचार्य श्रीऋषिराजजी शास्त्री महानुभाव (श्रीमामाजी) यांच्या सुचनेने राहुरी तहशिल कार्यालयात तहसीलदार नामदेव पाटील आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना भेट देण्यात आली.
तसेच राहुरी पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि राहुरी नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकार .घटकांबळे , सुनिल कुमावत आणि अक्षय तनपुरे ,बाबा गुंजाळ तसेच राहुरी पंचायत समितीत गट विकास अधिकार वैभव शिंदे साहेब यांना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीची प्रतिमेची अडचण भासू नये या साठी प्रतिमा भेट देण्यात आली.
या प्रसंगी पु.प.दयालमुनीदादा, प.पु.धर्मराजदादा, प.पु.शामसुंदरआण्णा, प.पू प्रसाददादा , बाळासाहेब तोडमल, मा.नगराध्यक्ष आसाराम शेजुळ,रविद्र कोरङे ,हर्षल शेटे ,पप्पु महानुभाव,दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते श्रीचक्रधरस्वामींची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी रविद्र तनपुरे,सुनिल कोरङे,किशोर पेरणे,सुजित कोरङे,रितेश लांबे,दिपक लांबे,संकेत दुधाङे आणि संदिप सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी परमेश्वर अवतार असुन त्यांचे अवतार १२व्या शतकातील आहे. त्यांच्या जीवन चरित्राची , त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची, धर्मिक कार्याची, स्त्रियांना समानतेचा अधिकार, अहिंसा प्रमोधर्म, अंधश्रद्धा निर्मूलन , इत्यादी कार्याची माहिती मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ असलेल्या *लीळाचरित्र* ग्रंथातून मिळते.
Post a Comment
0 Comments