सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष प्रतिनिधी
सध्याच्या महायुती सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक सुवर्णकार समाजासाठी निर्णय घेतला आहे .
सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे . राज्य राज्यातील सुवर्णकार सराफ कारागीर संघटना यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी केली जात होती . अनेक गणमान्य शासनकर्त्यांनी आश्वासनही दिली होती .
राज्यात सध्याच्या महायुती सरकारने आपल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता दिल्याने राज्यातील सुवर्णकार सराफ कारागीर यांच्याकडून स्वागत केले जात असून राज्य सरकारचे अभिनंदनही केले जात आहे .
संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत सोनार समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे . या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय पुणे येथे राहील असे सांगण्यात आले आहे .
सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिल्याबद्दल महायुती सरकारचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे
Post a Comment
0 Comments