आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताच राहुरीत समर्थकांकडून जल्लोष
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताच
राहुरी शहर व परिसरात फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला .
आमदार तनपुरे यांना विधानसभेतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळांने उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केला होता. त्या पुरस्काराचे वितरण आज मुंबईतील विधानभवनात राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार तनपुरे यांचे नाव पुकारताच राहुरीत जल्लोष सुरू झाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे , उपसभापती बाळासाहेब खुळे , संचालक दत्तात्रय कवाणे , दत्तात्रय शेळके चंद्रकांत पानसंबळ प्रभाकर पानसंबळ के एम पानसरे आबासाहेब वाघमारे सुनील आडसुरे ऋषिकेश मोरे मारुती हारदे सरपंच प्रभाकर गाडे भाऊसाहेब देशमुख
केशरबाई पतसंस्थेत सागर तनपुरे प्रकाश तनपुरे गणेश पवार शिवाजी वराळे तुषार काळे एकनाथ बर्डे योगेश रोकडे सदाशिव सरोदे भाऊ तागड
शनी मंदिर चौकात माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक शहाजी जाधव मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी अय्युब पठाण नगरसेवक अशोक आहेर संतोष आघाव महेश उदावंत गजानन सातभाई प्रशांत कोळपकर गणेश कोहकडे जगन्नाथ काळे किशोर पातोरे आदी सहभागी झाले होते .
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Post a Comment
0 Comments