भवानी मातेची पालखी भावपूर्ण वातावरणात राहुरीतून रवाना
राहुरी ( प्रतिनिधी )
तुळजापूरच्या भवानी मातेचे माहेरघर मानला जाणाऱ्या राहुरीतून भवानी मातेच्या पालखी खणा नारळाने ओटी भरवून खेळवत
ट्रॉलीमध्ये शहरात मिरवून तुळजापूरकडे जाण्यासाठी भावपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आली .
तुळजापूर येथील नवरात्रोत्सवासाठी आज राहुरी च्या शिवाजी चौकातील श्री तुळजाभवानी मातीच्या मंदिरात देवीचे मानकरी व भगत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली . यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे , सौ सुजाताई तनपुरे , हर्ष तनपुरे , माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदींच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले . त्यानंतर शिवाजी चौकात पालखी खेळविण्यात आली .
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पालखी ठेवून मेन रोड, आझाद चौक ,शनी मारुती चौक ,नवी पेठ ,शुक्लेश्वर चौक ,स्टेशन रोड ,कासार गल्ली ,कानिफनाथ चौक ,क्रांती चौक, सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा येथे पालखीचे राहुरीकरांनी खणा नारळाने ओटी भरून दर्शन घेतले.
यावेळी भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली . राहुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी पालखीचे पूजन केले . कोळीवाडा येथे पालखी मुळा नदीतून देसवंडी कडे रवाना करताना हजारो भक्तांनी आई राजा उदो उदो , तुळजाभवानी माता की जय घोषणांनी भावपूर्ण अशा वातावरणात रवाना करण्यात आली .
Post a Comment
0 Comments