Type Here to Get Search Results !

पहा तुळजाभवानी मातेच्या पालखीचे भावनिक दृश्य

तुळजाभवानी मातेची पालखी झाली विराजमान



 राहुरी  ( प्रतिनिधी )




राहुरी माहेरवाशीण असणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेच्या पालखी शहरातील शिवाजी चौकातील भवान मातेच्या  मंदिरात विराजमान झाली असून येत्या भाद्रपद द्वितीयेला शहरात पालखी खेळवली जाऊन खणा नारळाचे ओटी भरून तुळजापुराकडे रवाना करण्यात येणार आहे .

श्री क्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या राहुरीत काही दिवसांपूर्वीच तुळजापूरहून पालखीचा दांडा आला होता . 


 शहरातील विविध जाती धर्माच्या मानकऱ्यांकडून नव्याने पालखी तयार करत बुधवारी सायंकाळी शिवाजी चौकातील भवानी मातेच्या मंदिरात विराजमान करण्यात आली आहे . 
                                                          (Advt)

यावेळी पालखीचे मानकरी उपस्थित होते . भाद्रपद द्वितीयाला 18 किंवा 19 सप्टेंबरला खणा नारळाने ओटी भरून पालखी रवाना करण्यात येणार आहे . 




नगर राहुरी तालुक्यातील 30 ते 40 गावात पालखी मिरवून मुक्काम करून भिंगार आणि केडगाव येथील देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या दर्शनासाठी राहील . येत्या 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा ला तुळजापुरात मोठ्या उत्साहात पालखी साजरा करण्यात येणार आहे . राहुरीत भवानी मातेची पालखी मंदिरात विराजमान झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे .

Post a Comment

0 Comments