विधानसभेत प्रश्न विचारण्याचे ठरवले अन मलाच आमदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागले !!
माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं किस्सा
राहुरी ( प्रतिनिधी )
विधानसभेत उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राहुरी सराफ सुवर्णकार व कारागीर संघटनेच्या वतीने राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा रविवारी राहुरीत सत्कार करण्यात आला .
राहुरी शहरातील सोनार गल्लीतील संत नरहरी महाराज भैरवनाथ मंदिरात हा सत्कार करण्यात आला . यावेळी सराफ सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सराफ व्यावसायिक , सुवर्ण कारागिरांसह समाज बांधव उपस्थित होते .
सत्काराला उत्तर देताना आमदार तनपुरे म्हणाले की , माझ्या विधानसभेतील विजयाला राहुरीकरांची मोलाची साथ लाभली आहे . सर्व समाजवेशक , तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांकडे मी नगराध्यक्ष असल्यापासून नेहमीच लक्ष राहिलेले आहे. आमदारकीच्या काळात त्यात नक्कीच भर पडल्याचे त्यांनी सांगितले . आठवण करून देताना ते म्हणाले की , मी पहिल्यांदाच विधानसभेत विजयी होताना विधानसभेच्या सभागृहात राहुरी -नगर -पाथर्डी या मतदारसंघातील भरपूर प्रश्न विचारण्याचे ठरवले होते , मात्र सुदैवाने आमचे सरकार आले व राज्यमंत्री पद मिळाल्याने सभागृहात आमदारांकडून मलाच प्रश्न विचारण्याचे योग आले . एवढेच नव्हे तर या काळात नगर विकास , वीज , महानगरपालिका आदी खात्यातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आत्मसात केला . अडीच वर्षानंतर विरोधी बाकावर बसावं लागले . तेव्हाही राहुरीकरांसह नगर , पाथर्डी तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत आपण विधानसभेत अभ्यासपूर्वक आवाज उठवला . याच यशामुळे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार स्वीकारण्याचे सुवर्णसंधी मिळाली .
राहुरी येथील सराफ सुवर्णकार बांधवांचे तनपुरे कुटुंबीयांशी गेल्या तीन पिढ्यांपासूनचे एक वेगळे नाते आहे . सुवर्णकार समाज नेहमीच तनपुरे कुटुंबीयांसमवेत राहिलेला आहे , कोणत्याही अडीअडचणीत बरोबर राहिलेला आहे . असेच प्रेम स्नेह या पुढील काळात समाज व तनपुरे कुटुंबीय यांच्यात राहील , अशी ग्वाही देतो असेही तनपुरे यावेळी म्हणाले . सराफ संघटनेचे अध्यक्ष बंडू उदावंत यांनी प्रास्ताविक केले संजीव उदावंत यांनी सूत्रसंचालन तर श्रीनिवास सहदेव यांनी आपले विचार मांडले . यावेळी मोठ्या संख्येने सुवर्णकार बांधव उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments